हासेगाव फार्मसी चे नाईपर परीक्षेत घवघवीत यश
औसा ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय औषधनिर्माणशास्त्र शैक्षणिक आणि संशोधन संस्था (NIPER), कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेत औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज फार्मसी हासेगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी माधुरी शिंदे ( ऑल इंडिया रॅक एम फार्मा – २११४ , एम टेक – ५४५ ,) सबा शेख (ऑल इंडिया रॅक एम फार्मा – ३३६४ ,एम टेक -६८४), शमशौदीन शेख (ऑल इंडिया रॅक ३७४७), सिद्धार्थ ओटले (ऑल इंडिया रॅक५०१६),सोमेश जक्कलवाड (ऑल इंडिया रॅक ५१६१, एम. टेक-७३०) या विद्यार्थ्यानेनाईपर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादित केले आहे.
(NIPER) राष्ट्रीय औषधनिर्माणशास्त्र शैक्षणिक आणि संशोधन संस्था हि राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील संस्था आहे . या संस्थेने संपूर्ण विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे . मोहाली, अहमदाबाद ,हैद्राबाद ,रायबरेली ,कोलकत्ता ,हाजीपूर आणि गुवाहाटी येथे नाईपर अंतर्गत देशात एकूण सात महाविद्यालय आहेत . नाईपर येथे पात्र विद्यार्थ्यांना एम.फार्मा ,एम टेक ,एम बी ए (फार्मा ) आणि पीएचडी . या क्षेत्रामध्ये संधी मिळते . महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे सचिव वेताळेश्वर बावगे ,प्रा. माधुरी बावगे ,प्राचार्य श्रीनिवास बुमरेला यांच्या हस्ते नाईपर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याच बरोबर लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह , ज्ञानसागर विद्यालय,हासेगाव , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथआप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.