औसा दि. २३ जुलै-
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई च्या वतीने दर वर्षी तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक अवेक्षण केले जाते व त्यांना मानांकन दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर डी.टी.ई. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, या दोन्ही महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईचे संचालक प्रमोद नाईक यांनी आपल्या अभिनंदनपर पत्राद्वारे संस्थेचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर संस्थेची शैक्षणिक कामगिरी भविष्यात अशीच वाढत जावो. अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावच्या प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यामुळे या यशाचे शिखर गाठता आले. असे मत संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. विरेंद्र मेश्राम, गंगाधर धानुरे, सताळाचे सरपंच शिवलिंग जळकुटे, लातूरचे विधिज्ञ पी.एम. देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, वेताळेश्वर बावगे, शिवलिंग जेवळे, नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानसगर विद्यालय, गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, लातूर कॉलेज ऑफ सायन्स या शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी डी फार्मसी महाविद्यालयाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.